बुलढाणा (हॅलो बुलढाणा) समृद्धी महामार्गावर हिंदू राष्ट्र सेनाने टीप दिल्याने समृद्धी महामार्गावरून दोन ते तीन करोड रुपयांचा गुटखा वाहतूक करणाऱ्या आयशरला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
समृद्धी महामार्गावर तत्पूर्वीच गोवंश घेऊन जाणारा कंटेनर पकडला होता. आता करोडो रुपयांचा गुटखा पकडण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, समृद्धी महामार्गावरून नागपूर ते मुंबईकडे एम एच 20, जिसी 2385 क्रमांकाचा आयशर भरधाव जात होता. दरम्यान हिंदू राष्ट्र सेनाने एका वाहनाने या आयशरचा पाठलाग केला. हा आयशर दुसर बीड येथील देशमुख यांची गाडी उडवून आणि एका ट्रकला खेटून वेगाने जात होता. दरम्यान याबाबतची माहिती जालना, सिंदखेड राजा आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांना हिंदू राष्ट्र सेनेने दिली. परंतु प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी समृद्धी महामार्गावरील कंट्रोल रूमला फोन करून याबाबत कळविले असता, सदर आयशरला ट्रक आडवे करून रोखण्यात आले. दरम्यान आरोपीला अटक करण्यात येऊन दोन ते तीन करोड रुपयांचा गुटखा फुलंब्री पोलिसांनी जप्त केला. पोलीस स्टेशनचे पीआय सहाने पुढील तपास करीत आहेत.