शेगाव (हॅलो बुलढाणा) राज्यात दुष्काळाच्या झळांनी शेतकरी होरपळत असताना शेगावच्या श्री गजानन महाराज संस्थानने पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकीचा मोठा आदर्श उभा केला आहे. संकटात सापडलेल्या बळीराजाच्या मदतीसाठी संस्थानने थेट १ कोटी ११ लाख रुपयांचा सहयोग निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिला आहे.
श्री गजानन महाराज संस्थानच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, यंदा अल निनोच्या प्रभावामुळे पावसाने मोठी ओढ दिल्याने राज्यातील अनेक भागांत गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर दुष्काळामुळे बाधित शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळावा, यासाठी संस्थानच्या वतीने हा मोठा निर्णय घेण्यात आला.
२७ सप्टेंबर २०२६ रोजी १ कोटी ११ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला, अशी माहिती संस्थानने दिली आहे.
सेवा, त्याग आणि मानवतेचा वारसा जपणाऱ्या श्री गजानन महाराज संस्थानने संकटाच्या काळात शेतकऱ्यांसाठी उचललेले हे पाऊल सध्या सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत आहे











Total Users : 3519802