बुलढाणा (हॅलो बुलढाणा) योगांजली योगवर्गात आषाढी एकादशीचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
महिला योग साधिकांनी विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीची सुंदर पालखी सजवली होती. पावली नृत्य करत महिलांनी परिसरात विठ्ठल रूखमाईच्या मूर्तीसह दिंडी काढली.जय जय राम कृष्ण हरीच्या गजराने परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.