बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आमदार संजय गायकवाड निधी खेचून आणण्यासाठी म्हणा की विरोधकांसाठी जसे आक्रमक होतात.. तसे ते मृदू हृदयी देखील आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेकांना आधार दिला.. मदतीचा हात दिला! आजही त्यांनी
मोहेगाव येथील स्वर्गीय गजानन माधव पवार रुग्णालयात दाखल असताना, मदत केली परंतु दुर्दैवाने पवार यांचे दुःखद निधन झाले. दरम्यान आ. गायकवाड यांनी त्यांच्या पत्नी श्रीमती जनाबाई गजानन पवार यांना १०,००० रुपये व ३ महिने पुरेल इतका किराणा देत मदतीचा हात दिला आहे.
मोताळा तालुक्यातील मोहेगाव येथील स्वर्गीय गजानन माधव पवार हे बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये ऍडमिट होते. यावेळी आ.गायकवाड यांनी त्यांना रक्त उपलब्ध करून दिले होते परंतु तब्येतीमध्ये सुधार येत नसल्याकारणाने डॉक्टरांनी त्यांना अकोला येथे रेफर करण्यास सांगितले. आमदार गायकवाड यांनी तत्काळ ॲम्बुलन्स उपलब्ध करून दिली. उपचारादरम्यान पवारांची त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान १७ जुलै रोजी शिवसेना मातोश्री जनसंपर्क कार्यालय येथे स्वर्गीय गजानन माधव पवार यांच्या पत्नी श्रीमती जनाबाई गजानन पवार यांना आ. गायकवाड यांच्यातर्फे १०,००० रुपयाची आर्थिक मदत तसेच ३ महिने पुरेल इतका किराणा असा मदतीचा हात देण्यात आला आहे. यावेळी सोबत महाराष्ट्र राज्य युवा सेना कार्यकारिणी सदस्य युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड, शिवसेना शहरप्रमुख गजेंद्र दांदडे, शिवसेना विभाग प्रमुख राम चव्हाण, किशोर पवार आदी उपस्थित होते.