spot_img
spot_img

‘वाळू तस्कर पुष्पा आता झुकणार!’ चंद्रकांत खरात यांच्या पाठपुराव्याचा इम्पॅक्ट! बेकायदा गौण खनिज वाहतुकी विरोधात राज्यभर होणार कारवाई! परिवहन आयुक्तांचे सर्व प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना निर्देश!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) माफियाअनधिकृतपणे वाळू,गौण खनिजांचे उत्खनन करून, त्याची वाहतूक करीत आहेत. अनधिकृतपणे होणाऱ्या कृत्यात सहभागी वाहनधारकांना लगाम लावण्यासाठी, राज्यभर विभागीय कारवाईचे निर्देश परिवहन आयुक्त कार्यालयाकडून सर्व प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.विशेष म्हणजे सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत खरात यांच्या पाठपुराव्याची शासनाने दखल घेतली असून, टप्प्याटप्प्याने कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. याबाबत पहिल्या गुन्ह्यासाठी ३० दिवस, दुसऱ्या गुन्ह्यासाठी ६० दिवसांसाठी परवाना निलंबित व तिसऱ्या गुन्ह्यात वाहन अटकाव करून परवाना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध गौण खनिज उत्खनन, वापर व वाहतुकीच्या गंभीर प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत ज्ञानदेव खरात यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याची अखेर शासनस्तरावर दखल घेण्यात आली. खरात यांनी या संदर्भात शासन व परिवहन विभागाकडे निवेदने, तक्रारी व पाठपुरावा करून अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांवर प्रभावी व एकसमान कारवाई करण्याची मागणी केली होती.या पाठपुराव्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य परिवहन प्राधिकरणाने राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन प्राधिकरणांना अवैध वाळू तसेच इतर गौण खनिजांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन अधिनियम, १९८८ मधील कलम ६८ अन्वये विभागीय कारवाई करण्याबाबत निर्देश दिले आहेत.

▪️कारवाईच्या प्रभावी अंमलबजावणी ची अपेक्षा!

आता शासनाने राज्यस्तरावर कारवाईसाठी स्पष्ट निर्देश दिल्या नंतर संबंधित जिल्हास्तरीय यंत्रणांनी शासनाच्या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी करून प्रत्यक्ष कारवाई करणे आवश्यक असल्याची अपेक्षा चंद्रकांत खरात यांनी व्यक्त केली आहे. निर्देशांची अंमलबजावणी प्रत्यक्षात कितपत होते, अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांवर किती कारवाया होतात आणि पुनरावृत्ती करणाऱ्या वाहनांचे परवाने निलंबित अथवा रद्द करण्याची कार्यवाही होते का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!