spot_img
spot_img

संदीप शेळके यांनी अशी केली आषाढी साजरी! – भाविकांना वाटले फराळ! – -सुखसमृद्धीचे विठ्ठलाला साखडे!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) दरवर्षीप्रमाणे आषाढी एकादशीनिमित्त वन बुलढाणा मिशन, राजर्षी शाहू मल्टिस्टेटच्यावतीने भाविकांना साखळी फाटा येथे फराळाचे वाटप करण्यात आले. शेतकऱ्यांच्या जीवनात सुखसमृद्धी व भरभराट येवो, अशी प्रार्थना राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके यांनी विठ्ठलचरणी केली.

आषाढी एकादशीला मोठ्या संख्येने भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात. जिल्हयातील विठ्ठल -रुख्मिनी मंदिरांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जाते. आषाढीला भाविक उपवास ठेवतात. राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके यांच्या संकल्पनेतून भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले. त्यांच्या हस्ते विठूमाऊलीचे पूजन करण्यात आले. यावेळी डोंगरखंडाळाचे उपसरपंच श्याम पाटील सावळे, वसंता इंगळे, पृथ्वी राजपूत, शरद मोहिते यांच्यासह भाविक उपस्थित होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!