spot_img
spot_img

जागर! जागतिक सर्प दिन असा झाला साजरा?

लोणार (हॅलो बुलढाणा) निसर्ग मल्टी पर्पज फाउंडेशन व ‘मी लोणारकर’ टीम च्या वतीने 16 जुलै रोजी जागतिक सर्प दिना निमित्त सर्प शिक्षा अभियान राबविण्यात आले.

श्री शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज लोणार व सेंट्रल पब्लिक स्कूल लोणार येथे सर्प शिक्षा अभियान अंतर्गत सापा बद्दल जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांना सापाची ओळख, विषारी, बिनविषारी सापांची माहिती देण्यात आली. सर्पदंश का होतो त्यांवर प्रथमोपचार कसे करावे व सापांपासून स्वतःचे सरक्षण कसे करावे यावीषयी सखोल माहिती देण्यात आली. या प्रसंगी सर्प मित्र विनय कुलकर्णी, सचिन कापुरे, कमलेश आगरकर, अजय हिवाळे, बंटी नरवाडे, विलास खरात, रुतिक सुसर, चंदू अंभोरे, विलास जाधव, उमेश चीपडे, वनिता बोराडे तसेच लोणार वन्य जीव अभयारण्याचे वनरक्षक ज्ञानेश्वर शिंदे उपस्थित होते श्री शिवाजी हायस्कूल लोणार चे मुख्यध्यापक म्हस्के सर व लोणार सेंट्रल पब्लिक स्कूल चे मुख्याध्यापक दत्तात्रय कुलकर्णी यांनी सर्पमित्रांचे आभार व्यक्त केले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!