बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जपानमध्ये आकर्षक पगाराची नोकरी आणि उज्ज्वल भविष्य घडवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (BARTI), पुणे आणि SKYHY VOCATIONAL & SKILLING PRIVATE LIMITED यांच्या संयुक्त विद्यमाने जपानी भाषा (JLPT-N5) अभ्यासक्रमाचे १०० टक्के मोफत प्रशिक्षण देण्यात येणार असून प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे.
या प्रशिक्षणात जपानी भाषेचे वाचन, लेखन, संभाषण आणि श्रवण कौशल्यांवर विशेष भर दिला जाणार आहे. अनुभवी प्रशिक्षकांकडून जपानी भाषा व संस्कृतीची ओळख, परीक्षा व प्रमाणपत्र मार्गदर्शन, मुलाखतीची तयारी आणि जपानमधील रोजगाराच्या संधींबाबत करिअर मार्गदर्शन केले जाणार आहे.
ऑटोमोबाईल, आयटी, मॅन्युफॅक्चरिंग, हॉस्पिटॅलिटी आणि केअरगिव्हर यांसारख्या क्षेत्रांत करिअरची दारे खुली करण्यासाठी हे प्रशिक्षण महत्त्वाचे ठरणार आहे. १८ ते ३५ वर्षे वयोगटातील अनुसूचित जातीचे विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र आहेत.
जागा मर्यादित असल्याने इच्छुकांनी वेळ न दवडता आजच नोंदणी करावी!
📞 संपर्क : 9225126487 | 9511003717
आजच आपला प्रवेश करा!
📍 पत्ता सोसायटी पेट्रोल पंपाजवळ, चिखली रोड, सुंदरखेड, बुलढाणा.

भाषा शिका… करिअर घडवा… जपानकडे भरारी घ्या!











Total Users : 3408184