देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा) ‘संपू दे अंधार सारा, उजळू दे आकाश तारे,गंधाळल्या पाहटेस येथे वाहू दे आनंद वारे..!’
पांडुरंगाची पताका फडकावीत टाळ मृदंगाचा गजर व हरीनामाचा जयघोष करित आषाढी एकादशी निमित्त हजारो दिंड्या पांडुरंगाचे नामस्मरण करित पंढरपूरला दाखल झाल्या आहेत. आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला भक्तिमय सोहळा असतोय.पांडुरंगाच्या प्रति अपारंपर असलेली भक्ती म्हणून तालुक्यातील देऊळगाव महीच्या डी. आर. बी इंटरनॅशनल स्कुलच्या विद्यार्थ्यांनी शहरातुन भगवेमय पताका हाथी घेऊन टाळ मृदंगचा गजर करित भव्य-दिव्य दिंडी मिरवणूक काढली.कपाळी अष्टगंध,डोक्यावर तुळशी वृंदावन ,मृदंग टाळांचा गजर,मुखी ज्ञानबा ज्ञानबा माऊली तुकाराम नाम जयघोष करित पांडुरंग विठ्ठल रुखमिनीची वेशभूषा साकारून शहरात भक्तिमय वातावरण निर्माण केले . डीग्रस चौक, बस स्टॉप चौक, दत्तमंदिर चौक, विठ्ठल मंदिर चौक यासर्व ठिकाणी विद्यार्थ्यांनी लेझिम नृत्य, टाळ नृत्य, पांडुरंगाचा जयघोष केला. याप्रसंगी भक्तिमय वातावरण निर्माण झाल्याने उच्च शिक्षणासह आध्यात्मिकाची गोडी देणाऱ्या स्कुलचे अनेकांनी कौतुक केले. यावेळी डी.आर.बी.इंटरनॅशनल स्कुलचे संस्थापक अध्यक्ष अजित बेगाणी,उपाध्यक्ष रामकिसन म्हस्के,संचालक पुरषोत्तम शिंगणे, शेख दादाभाई,महेश नागरे,शेख अजगर, सुरेश जैन,सुनील मोरे, चेतक बागमार, विनोद जैन यांच्यासह शिक्षक-शिक्षिका कर्मचारी वृंद उपस्थित होते.