बुलढाणा (हॅलो बुलढाणा) स्मार्ट कॉटन प्रकल्पात बुलढाणा जिल्हा परत समाविष्ट करावा, अशी मागणी बुलढाण्यातून करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
कापूस मूल्य साखळी विकास उप प्रकल्प (स्मार्ट प्रकल्पात) बुलढाणा जिल्हा परत समाविष्ट करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. सदर प्रकल्प हा शेतकऱ्याच्या कष्टाने व महागडा उत्पादन खर्च करून पिकवलेल्या शेतमालावर प्रक्रिया करून मूल्यवर्धन करण्यासाठी राबविला जात आहे. परंतु काही नैसर्गिक आपत्ती उत्पादनात घट बाजारात कापसाला चांगला दर न मिळाल्याने गेल्या दोन वर्षात शेतकरी वर्गाने फारशी उत्सुकता दाखवली नव्हती. त्यामुळे पूर्वीच्या 12 जिल्ह्यातून 5 जिल्हे या महत्त्वकांक्षी प्रकल्पातून उघडण्यात आले. यावर्षी मात्र कापूस बाजार दरामध्ये तेजी राहिलेली आहे. परिणामी कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या घरातच कापूस पडून आहे. सदर योजना सामान्यतः मागासलेल्या भागात तात्काळ कार्यरत होत नाही त्याला थोडा अतिरिक्त उदी लागतो या योजनेबाबतही असेच झाली आहे त्यामुळे स्मार्ट कॉटन प्रकल्पात बुलढाणा जिल्हा परत समाविष्ट करण्यात यावा अशी मागणी, दत्ता पाटील,अरविंद जाधव यांच्यासह इतरांनी केली आहे.