साखरखेर्डा (हॅलो बुलढाणा/ दर्शन गवई ) येथील अमोल निवास असलेल्या शेतकऱ्यांच्या घरावर महसूल विभागाच्या पथकाने काल दुपारी पाच वाजता छापा टाकला.नेमका छापा टाकण्याचा उद्देश काय होता हे सगळे गुलदस्त्यात ठेवून नायब तहसीलदार आस्मा मुजावर धडकल्याने या घरात काय आहे ? हे पाहण्यासाठी तोबा गर्दी उसळली होती.अखेर रात्री उशिरा धाडसत्र पुर्ण झाल्यावर ‘खोदा पहाड निकला चुहा’ अशी अवस्था पथकाची झाली.
दुपारी पाच वाजता निवासी नायब तहसीलदार आस्मा मुजावर यांनी गोपणीय माहिती मिळाल्याच्या कारणावरून रमेश माधवराव तुपकर यांच्या अमोल निवास स्थांनी दोन गोडाऊन पालक, मंडळाधिकारी, तलाठी आणि पोलीस कर्मचारी सोबत घेऊन घेऊन घरात प्रवेश केला.परंतू मधूमती तुपकर आणि त्यांच्या मुलीने घरात येण्यास मज्जाव केला.माझे पती घरी नाही ते आल्यावर तुम्हाला काय झडती घ्यायची ती घ्या असे सुनावले. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुरेश तुपकर , रमेश तुपकर हे सायंकाळी सहा वाजता घरी आले. त्यांनी छापा टाकण्यासाठी सर्च परवाना मागितला आणि आपली ओळख काय ते दाखवा. त्यानंतर आस्मा मुजावर यांनी एक लेखी पत्र लिहून त्यांना दिले . तो पर्यंत नायब तहसीलदार यांनी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात यावा अशी मागणी केली.ठाणेदार स्वप्निल नाईक , पी एस आय रवी सानप , चार जमादार , दोन महिला पोलिस , इतर पोलीस कर्मचारी , तीन मंडळाधिकारी , २५ तलाठी , प्रभारी नायब तहसीलदार , पुरवठा निरीक्षक , गोदाम व्यवस्थापक यांच्या पथकाने रात्री 9 वाजता घरात प्रवेश करुन झडती घेतली. त्या झडतीत 280 सोयाबीन पोते या पलिकडे त्या शेतकऱ्यांच्या घरात काहीच मिळाले नाही. याबाबत पत्रकारांनी छापा टाकण्याचा उद्देश काय आहे , असा प्रश्र्न विचारला असता पंचनामा करून सांगते असे उत्तर दिले. पंचनामा करायला पुन्हा टाळाटाळ करुन घटणास्थळावरुन जाण्याचा प्रयत्न नायब तहसीलदार आस्मा मुजावर यांनी केला. परंतू उपस्थित नागरिकांनी अगोदर पंचनामा करा आणि आपला उद्देश काय होता हे लेखी घेतले असता आम्हाला घरामध्ये राशनचा अवैध साठा असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यावरुन छापा टाकल्याचे नुमद केले.
या छापा प्रकरणात नेमकं त्यांना काय साध्य करायचे होते. हा प्रश्न अनुत्तरितच राहिला.
————
आज सकाळी मधुमती रमेश तुपकर यांनी पोलीस स्टेशन मध्ये तंक्रार दाखल केली की, नायब तहसीलदार आस्मा मुजावर , महसूलचे पुरवठा निरीक्षक शेख यांच्यासह चौघांनी घरात घुसून दमदाटी करून तुमच्या घरात अवैध तांदूळ व गहू , तेल असा राशनचा साठा आहे. तो आम्हाला दाखवा. प्रकरण निपटावयाचे असेल तर 20 लाख रुपये द्या अशी मागणी केली.अशा आशयाची तंक्रार दाखल केली आहे ——————
नायब तहसीलदार यांच्या फोनवर मी आलो आहे . कोणत्याही प्रकारचा अवैध साठा मिळून आला नाही. याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे प्रा.संजय खडसे
उपविभागीय अधिकारी
सिंदखेडराजा यांनी म्हटले आहे.














