बुलढाणा (हॅलो बुलढाणा) ग्रामपंचायत आणि सदस्य काम करत नाहीत असा,आरोप सातत्याने होत असतो. हे खरे पण आहे. निवडून आले की, रस्ता नाही भौतिक सुविधा नाही, कोणताच विकास करीत नाहीत.आताचे चित्र विदारक असुन,सागवन गावात जाण्यासाठी असलेल्या रस्त्याची पुरती दुरवस्था झाली आहे.(फोटोमध्ये पहा)
गायरान पासून वॉटरहाऊस रोड ते सागवन जाणारा रोड अत्यंत खराब झाला आहे. नागरीकांना याचा खूप त्रास काम करावा लागत आहे.रस्त्याने गाडी जात तर नाहीच पण पायी सुध्दा चालता येत नाही.ग्रामपंचायतचे सरपंच व सदस्य काय करत आहे? ग्रामपंचायतने या रस्त्याकडे लक्ष द्यावे,अशी मागणी जोर धरत आहे. दरम्यान ग्रामपंचायत चे सदस्य व सरपंच केवळ स्वार्थ साधत असून ग्रामस्थांची कामे बाजूला ठेवत आहे. यांच्यावर कोणत्या राजकीय पुढारींचा वरदहस्त आहे आणि अधिकारी यांना कसे काय यांच्या चुकीला माफ करतात? हा प्रश्न महत्त्वाचा असून ग्रामस्थ याबाबत चर्चा करीत आहे.