spot_img
spot_img

संत नरहरी नाथ महाराज मठात ऑक्सिजन!

देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा) संत नरहरी नाथ महाराज मठात ऑक्सिजनयुक्त झाडांची लागवड करण्यात आली.जायंटस परीवारा तर्फे वृक्ष लागवड व संगोपनाचा संकल्प करण्यात आला आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर ngo म्हणून कार्यरत असणाऱ्या जायंटस वेल फेअर फाऊंडेशन च्या देऊळगाव राजा जायंटस परिवाराने विविध सामाजिक उपक्रमासोबत पर्यावरण संतुलनासाठी यावर्षी श्री संत नरहरी नाथ महाराज मठाचे प्रांगणात ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षांची लागवड करून त्याचे पूर्णपणे संगोपन करण्याचे नियोजन केले आहे. दिनांक 14 जुलै रोजी फेडरेशनचे माजी अध्यक्ष NCF पुरुषोत्तम धन्नावत, उपाध्यक्ष जुगलकिशोर हरकुट फेडरेशन डायरेक्टर सन्मती जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत जायंटस परिवाराच्या सदस्यांनी वृक्षांची लागवड केली. यावेळी जायंट्स परिवाराचे विजय मोतीलाल मांडोत ,संजय सराफ राजकुमार भन्साली संजय लोहिया ,उत्तम पिंपळे, मठाचे प्रमुख मोहन महाराज पैठणकर व उदबोध महाराज पैठणकर खडकपूर्णाचे सेवानिवृत्त का.अ. पंडितराव पाथरकर, किसनराव खरात आदी उपस्थित होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!