बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शेगाव येथील बस स्थानकावरील लॉज, बुलढाणा शहर संगम चौकातील जयस्वाल प्लाझमा हॉटेल नंतर चिखली येथील लॉजवर एकाने आधी अश्लील फोटो काढून ब्लॅकमेल करीत एका विवाहितेवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.
आरोपी गणेश काशिनाथ नरवाडे राहणार पारोळा जिल्हा जळगाव खान्देश याने एक सात वर्षाची मुलगी आणि एक मुलगा असलेल्या विवाहितेला ब्लॅकमेल करून फासले. पीडित महिला नंदुरबार येथे एका लग्न कार्यक्रमासाठी गेली होती. कपडे बदलण्यासाठी एका रूममध्ये विवाहिता गेली असताना आरोपींनी खिडकीतून तिचा अश्लील फोटो काढला. दरम्यान चार दिवस तेथेच राहिलेल्या विवाहितेला काढलेला फोटो तुझ्या पतीला व नातेवाईकाला दाखवून मी तुझी बदनामी करीन असे सांगितले. दरम्यान त्याने तिच्याशी लगट वाढवली. वारंवार फोन करू लागला. एका दिवशी खामगाव येथे आरोपी आला आणि मला तुझ्याशी बोलायचं आहे म्हणून भेटण्यास बोलाविले. दुचाकी वर बसून शेगावच्या रस्त्याने नेऊ लागला. पीडितेने विरोध केला असता चुपचाप बस नाहीतर बदनामी करेल असे म्हटले. शेगावातील लॉजवर नेऊन पीडित महिलेवर बळजबरीने अत्याचार केला. नंतर खामगाव येथे आणून सोडून कुणालाही काही सांगू नको अशी धमकी दिली. दरम्यान बुलढाणा येथे देखील बऱ्याच वेळा येऊन बुलढाणा शहर संगम चौकातील जयस्वाल प्लाझमा येथे पीडित महिला सात महिन्याच्या मुलाला सोबत घेऊन गेली होती. आरोपी म्हणाला की माझ्यासोबत लग्न कर आणि मुलाला मला दे.. असे म्हणत आरोपीने पट्ट्याने मारहाण केली. दरम्यान पीडित विवाहितेच्या भावाने आरोपीला फोन लावला असता भावाला सुद्धा बंदुकीने उडवून टाकीन अशी धमकी दिली. याप्रकरणी पोलीसांनी गुन्हे दाखल केले असून तपास सुरू आहे.