spot_img
spot_img

SIR मध्ये सिंदखेड राजा मतदारसंघाचा ‘शतप्रतिशत’ झेंडा! ३.२१ लाख मतदारांची पडताळणी; २.९१ लाख EF फॉर्म डिजिटल, प्रशासनाच्या ‘मिशन मोड’ला मोठे यश!

सिंदखेड राजा (हॅलो बुलढाणा/वसीम शेख) मतदार याद्यांतील त्रुटी, मृत, स्थलांतरित, दुबार आणि शोधलागणाऱ्या मतदारांच्या नोंदींना चाप लावण्यासाठी राबविण्यात आलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात SIR अभियानात २४-सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाने शंभर टक्के काम पूर्ण केले आहे. तब्बललाख २१ हजार ७३० मतदारांची पडताळणी करण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी दिली.

मतदारसंघातील सर्व मतदारांना EF फॉर्मचे शंभर टक्के वितरण करण्यात आले. त्यापैकी तब्बल २ लाख ९१ हजार २५५ फॉर्मचे डिजिटायझेशन पूर्ण झाले असून, त्याचे प्रमाण ९०.५३ टक्के आहे. उर्वरित ३० हजार ४७५ प्रकरणांमध्ये विविध कारणांमुळे पूर्ण स्वरूपात फॉर्म प्राप्त होऊ शकले नाहीत.

पडताळणीदरम्यान मतदार यादीतील धक्कादायक वास्तवही समोर आले. यात ८ हजार ७८६ मृत मतदार, १३ हजार ६६५ कायमस्वरूपी स्थलांतरित, २ हजार २६ शोध न लागलेले आणि ५ हजार ९५५ दुबार मतदार आढळले. इतर कारणांतील ४३ मतदारांचाही समावेश असून, प्रत्येक नोंदीची आवश्यक पडताळणी करण्यात आली आहे.

मतदारसंघातील ३४० मतदान केंद्रांवर हे अभियान युद्धपातळीवर राबविण्यात आले. त्यासाठी ३४० BLO, ७० पर्यवेक्षक, ३५ झोनल अधिकारी आणि २४ सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी थेट मतदारांच्या दारापर्यंत पोहोचत माहिती संकलित केली.

प्रा. संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत वाघ, नागेश खरात, गणेश देशमुख, अमोल जाधव यांच्यासह महसूल आणि विविध विभागांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत महत्त्वपूर्ण योगदान दिले. राजकीय पक्षांचे पदाधिकारी, BLA एजंट, पत्रकार आणि मतदारांच्या समन्वयातून १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत सिंदखेड राजा मतदारसंघाने SIR अभियानात ‘शतप्रतिशत’ कामगिरीची मोहोर उमटवली

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!