3.6 C
New York
Friday, November 22, 2024

Buy now

spot_img
spot_img

हा वीरू टाकीवर नाही झाडावर चढला!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) त्याचे ही जंगलात वरिष्ठ असावे.. कदाचित त्याने त्यांना सलामीसाठी चढून उंच झाडावर अगदी शेंड्यापर्यंत पोहोचून सलामी दिली.असा प्रसंग आज दिसून आला. ही घटना आहे एका अस्वलाची! तो चक्क झाडाच्या शेंड्यावर पोहोचला.. त्याला वीरू स्टाईल आंदोलन करायचे होते की काय? हे माहीत नाही. परंतु जमिनीवर राहणारा अस्वल झाडाच्या शेंड्यावर पोहोचल्याने अनेकांनी याला कॅमेराबद्ध केले.

बुलडाणा शहर अजिंठा पर्वत रांगेवर बसलेले असून आजूबाजूला जंगलाचा भाग शहराला लागूनच आहे.मलकापूरकडे जातांना अजिंठा पर्वत रांगेतील राजूर घाट पार करावे लागतात.याच परिसरात हनवतखेड असून गावाला लागूनच बुलडाणा नगर पालिकेचा डंपिंग ग्राउंड आहे.या डंपिंग ग्राउंडवर अन्नच्या शोधात अस्वल, बिबट,तडस सारखे हिंस्त्र प्राणी दिसत असतात.2 दिवसा आगोदर याच हनवतखेड शिवारात एका शेतातील झाडाच्या शेंड्यावर एक भले मोठे अस्वल जाऊन बसल्याचे उघडकीस आले,या घटनेचा व्हीडिओ समाज माध्यमावर व्हायरल होत आहे.ही बाब परिसरातील शेतकरी व इतरांच्या लक्षात आल्यावर त्यांनी या भल्या मोठ्या अस्वलाला खाली उतरवण्यासाठी आरडाओरड केली पण अस्वल काही ऐकत नव्हता.अशात अंधार झाल्याने शेतकरी घरी परतले.घटनेचा व्हिडिओ काहींनी आपल्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड केला आहे.या परिसरात नेहमी हिंस्त्र प्राण्यांचे दर्शन होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!