बुलढाणा (हॅलो बुलढाणा) खस्ता झालेल्या रस्त्याची कहाणी विचारू नका.. कारण अतिक्रमण हा महत्त्वाचा मुद्दा आहे.नागरिकांना होत असलेल्या त्रासाच्या तक्रारी दिल्या.श्री गाडगे नगरातील मतदारांची संख्या मोठी आहे. नेमके हेच लक्षात घेऊन, आज सरपंचाने येथील निसर्डा रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू केले. येथील अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे परंतु भर पावसाळ्यात रस्ता कसा करणार? हा देखील एक प्रश्नच आहे.
एका अतिक्रमणामुळे अख्ख्या वस्तीचा रस्ता सुरळीत होत नाही. ही दुर्दैवाची बाब ओळखून सरपंच अर्पणा चव्हाण यांनी घटनास्थळावर हजर राहून अतिक्रमण काढण्यासाठी जेसीबी आणली.
चिखली रोडवरील गाडगे नगर, सुंदरखेड,बुलढाणा या भागात ओपन स्पेस असलेल्या जागेत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून रस्ता पूर्णपणे दाबण्यात आला होता. तो अद्यापही मोकळा झालेला नाही.
स्थानिक नागरिक तसेच लहान मुले शाळकरी विद्यार्थी व वृद्ध लोकांना जाण्या येण्यास प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.आज सकाळपासून सुंदरखेड ग्रामपंचायत ने ही मोहीम हाती घेऊन अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान रस्त्यात अडथळा येणाऱ्या वटे काही दुकानांच्या पायऱ्या जेसीबीच्या साह्याने काढून टाकल्या आणि रस्ता पूर्ण मोकळा करण्याचे काम सुरू आहे.