spot_img
spot_img

भावा, ‘कॉन्टॅक्ट पॉयझानिंग’ कशाला म्हणतात रे? – तर घे काळजी..

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जवळपास बुलढाणा जिल्ह्यातील पेरणी आटोपली आणि पिकांनी चांगलेच डोके वर काढले आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी पिकांवर फवारणी करण्याचा धडाका सुरू केला. पण भावांनो फवारणी करताना काळजी घ्यावी लागणार आहे.

शेतशिवारात पिकांची स्थिती समाधानकारक आहे.पण जीव धोक्यात घालून शेतकऱ्यांना शेती पिकांची निगराणी करावी लागते.जिल्हयामध्ये सोयाबीन, तूर,उडीद, मुंग आधी खरीप पिके आहेत.
सोयाबीन पीक सध्या वाढीच्या आणि फुलोरा अवस्थेत आहे. पिकांची वाढ समाधानकारक आहे.तसेच तूर,उडीद,मूग,बाजरी,खरीप ज्वारी ही पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. याही पिकांची वाढ समाधानकारक आहे. शेतकरी कीड आणि रोग नियंत्रणाकरीता विविध कीटकनाशकांची फवारणी करत असून फवारणी करताना विषबाधा होऊ नये, म्हणून काळजी घ्यावी,असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.शेतात उत्पन्न घेण्यासाठी शेतकरी विविध रासायनिक औषधे फवारतात. हेच रासायनिक औषधे शेतकरी शेतात, झाडांवर फवारताना मुख्यत: तीन प्रकारे धोका निर्माण होवू शकतो.रासायनिक औषधांचे अत्यंत बारीक कण हवेबरोबर श्वासोच्छवासासोबत शरीरात जातात.
फवारणी करीत असताना त्वचेच्या संपर्कामधून तथा डोळयांव्दारे शरीरात जातात.फवारणी करतांना नकळत तोंडाव्दारे खाताना, बीडी पिताना शरीरात जाऊ शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन ‘हॅलो बुलढाणा’ देखील करीत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!