spot_img
spot_img

पिकांना जगवावे कसे? -युरीया खतांची टंचाई अन् जादा भावाने विक्री

बुलढाणा (हॅलो बुलढाणा)शेतातील पिके बहरात आली असताना कृषी सेवा केंद्रातील युरीया गायब झाला असून काही ठिकाणी जादा भावाने विक्री होत असल्याने पिकांना जगवावे कसे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या गंभीर समस्येकडे कृषी अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.

जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागात उदाहरणार्थ
साखरखेर्डा येथे युरीया खतांची कुत्रिम टंचाई निर्माण करुन काही कृषी सेवा केंद्र चालक जादा भावाने विक्री करीत आहेत.आज साखरखेर्डा येथे १५ दुकाने असून एकाच दुकानात युरीया मिळत आहे. बाकी दुकानात युरीया नसल्याचे सांगितले जात आहे. नेमका युरीया नाही की कूत्रिम टंचाई निर्माण करुन शेतकऱ्यांची फसवणूक सुरु आहे याची चौकशी करणे गरजेचे झाले. शेंदुर्जन येथे कृषी सेवा केंद्रात युरीया खत उपलब्ध आहे परंतू पावती २६६ रुपयांची आणि पैसे ३२० प्रमाणे घेतले जात आहे . येथे शेतकऱ्यांची आर्थिक लुबाडणूक होत असल्याने याची दखल तालुका कृषी अधिकारी यांनी घ्यावी आणि शेतकऱ्यांना खत उपलब्ध करून द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!