बुलढाणा (हॅलो बुलढाणा) चित्रपटातील अल्लू अर्जुन अर्थात पुष्पा चंदनाचे झाड तोडून तस्करी करीत होता. आपल्याकडे वाटेल त्या प्रजातीचे झाड तोडल्या जात आहे. त्यामुळे सावधान! झाड तोडले तर आता 50 हजार रुपये दंड होणार आहे.
बुलढाणा जिल्हा जंगलव्याप्त जिल्हा आहे.
जिल्ह्यात बेसुमार वृक्षतोड होत आहे. या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे.बेकायदा होत असलेल्या वृक्षतोडीवर आळा घालण्यासाठी बेकायदा वृक्षतोडीच्या दंडाची रक्कम 1 हजार रुपयांवरून 50 हजार करण्यात येणार असल्याची घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत केली. विधानसभेत मुनगंटीवार म्हणाले, अवैधरित्या वृक्षतोडीसंदर्भात महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम 1964 व महाराष्ट्र लैंड रेव्हीनीव रेगुलेशन ऑफ ट्री या मध्ये 1967 च्या कायद्यानुसार 1 हजार रुपयांचा दंड आकारला जातो. त्यात नंतरच्या काळात वाढ केलेली नाही.1967 च्या हजार रुपयांचे आजचे मूल्य हे पन्नास पटीने वाढले असल्यामुळे यापुढे अवैधरित्या होणाऱ्या वृक्षतोडीला 50 हजार रुपये दंड आकारला जाईल. यासंदर्भात 15 जुलै सोमवारपर्यंत लेखी आदेश सोमवारपर्यंत जारी केला जाईल.या निर्णयाचे वन्यजीव सोयरे, बुलढाणा कडून स्वागत करण्यात येत आहे. “अवैध वृक्षतोड केल्यास पन्नास हजार रुपए दंड आकारण्यात आल्यास अवैध वृक्ष तोड़ करत असलेल्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होईल आणि अवैध वृक्षातोडीला आळा बसेल या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत वन्यजीव सोयरे, बुलढाणा कडून करत भविष्यात वृक्ष संवर्धन करावे, असे आवाहन वन्यजीव सोयरे, बुलढाणा कडून नितिन श्रीवास्तव यांनी केले आहे.