बुलडाणा/अकोला (हॅलो बुलढाणा) महावितरणच्या राज्यस्तरीय आंतर प्रादेशिक विभाग नाट्यस्पर्धेत नागपूर प्रादेशिक विभागाचे अकोला परिमंडळाने सादर केलेले आणि संजय पुरकर यांनी दिग्दर्शीत केलेले “नथिंग टू से” नाटकाने प्रेक्षकांच्या भावना अनावर करीत द्वितीय क्रमांकांसह वैयक्तिक गटात तीन पारितोषिके मिळवित उपविजेचे ठरले. कोकण प्रादेशिक विभागाने सादर केलेल्या ‘डबल गेम’ नाटकाने ईतर नाटकांचे गेम करत प्रथम क्रमांकासह वैयक्तिक गटात पाच पारितोषिके पटकावली आहे. महावितरणचे संचालक (संचालन तथा मानव संसाधन) अरविंद भादिकर यांचे हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
नागपूर येथील वसंतराव देशपांडे सभागृह येथे आयोजित दिनांक १२ व १३ जुलै या दोन दिवसीय नाट्यस्पर्धेत पुणे प्रादेशिक विभागाने ‘ती फ़ुलराणी’, छत्रपती संभाजी नगर प्रादेशिक विभागाने ‘उत्तरदायित्व’, कोकण प्रादेशिक विभागाने ‘डबल गेम’, आणि नागपूर प्रादेशिक विभागाने ‘नथिंग टु से’ असे एकापेक्षा एक दर्जेदार नाट्यकृती सादर केल्या.
यावेळीअरविंद भादिकर,
नाट्यस्पर्धेचे यजमान तथा नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी अकोला परिमंडलाचे मुख्य अभियंता सुहास रंगारी, मुख्यालयातील देयक व महसूल विभागाचे परेश भागवत,गोंदिया परिमंडलाच्या मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण, अमरावती परिमंडलाचे मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी, कोल्हापूर परिमंडलाचे मुख्य अभियंता स्वप्निल काटकर, छत्रपती संभाजी नगर परिमंडलाचे मुख्य अभियंता पवनकुमार कच्छोट, चंद्रपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता हरिष गजबे, रत्नागिरी परिमंडलाच्या प्रभारी मुख्य अभियंता कल्पना पाटील, मुख्य जनसंपर्क अधिकारी भरत पवार, या स्पर्धेचे परिक्षक प्रभाकर आंबोने, विनोद तुंबडे आणि मंजुश्री भगत डोंगरे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन रेणुका देशकर यांनी तर प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे यांनी केले.
……
न थिंग टू से चे दिग्दर्शक पुरकर यांना दिग्दर्शनाबद्दल व्दितीय,गौरी पुरकर यांना उत्तेजनार्थ आणि किशोर दाभेकर यांना प्रकाश योजनकरीता प्रथम पारीतोषिकांने गौरविण्यात आले.