बुलढाणा (हॅलो बुलढाणा) अमली पदार्थ ज्या सहजपणे उपलब्ध होत आहेत आणि तरुण पिढी ज्या वेगाने त्यांच्या आहारी जात आहे, ते सगळे चिंताजनक आहे. काही हॉटेल्स आणि पब्जवर धाडी घालून हा प्रश्न सुटणार आहे का? त्याच्या मुळाशी जायची आपली इच्छा आणि तयारी आहे का? पुणे हे विद्येचे माहेरघर असून, येथील कायदा व सुव्यवस्था बिघडली असल्याचा जोरदार प्रहार पदवीधर मतदार संघाचे आ. धीरज लिंगाडे यांनी पावसाळी अधिवेशनात केला.
पुण्यात अफू, गांजा, चरस या अमली पदार्थांचे सेवन श्रमिक आणि उच्चभ्रू वर्गात केले जात होते, त्याला आता जवळपास अनेक वर्षे उलटून गेली. हल्ली देखील अमली पदार्थांच्या विळख्यात तरुणाई अडकली.आकर्षण, मित्रमंडळींचा आग्रह, पालकांनाच सेवन करताना पाहणे, प्रतिष्ठेचे लक्षण, हिरोगिरी आणि ‘हे आता सर्वमान्य आहे,’ हा समज अशा कारणांनी अमली पदार्थ सेवन करण्याकडे तरुणाई वळत आहे. परंतु याचे संबंधित विभागाला काही दुःख नाही.असे का? याचा जाब विधिमंडळ अधिवेशनामध्ये शासनाकडे आमदार लिंगाडे यांनी विचारला.