बुलढाणा (हॅलो बुलढाणा) गोवंश तस्करीमुळे कत्तलखान्यात रक्ताचे पाट वाहत आहेत. काल रात्री राजस्थान पासिंगचा कंटेनर 40 गोवंशाला घेऊन जात असताना समृद्धी महामार्गावर पोलिसांनी पकडला. चालकाला विचारणा केली असता, ही महिन्यातील पाचवी ट्रिप असल्याचे सांगितल्याने, किती मोठ्या प्रमाणात मुक्या जीवाचा रक्ताचा पाट वाहतो, हे अमानविय कृत्य अधोरेखित झाले आहे.
मेहकर पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार देण्यात आली. ही तक्रार विजय पवार,हिंदु राष्ट्रसेना बुलडाणा जिल्हाध्यक्ष यांनी 13 जुलै रोजी दिली. रात्री साडेदहा वाजता मोनु संतोष अवस्थी रा. संतोषी मातानगर, मेहकर यांचा फोन आला व त्यांनी सांगीतले की, समृध्दी महामार्गाने मालेगाव कडुन एका कंटेनरमध्ये गायी आहे.त्या कत्तलीसाठी जालनाकडे जात असल्याची माहिती मिळाली. या
कंटेनरला पकडणे असल्याने अग्रवाल पेट्रोलपंपाजवळ येण्यास सांगीतले. त्यावरुन विजय पवार हे अग्रवाल पेट्रोलपंपाजवळ गेले असता तेथे मोनू अवस्थी, अवि भास्कर जाधव, सुनिल संजय राउत, शुभंम अशोक कदम, कृष्णा गणेश
खोडके, गोपाल विष्णू देशमुख सर्व रा. मेहकर कार मध्ये बसून समृद्धी महामार्गावर गेलेत. माहीतीप्रमाणे कंटेनर क्र. RJ-14-GR-1455 हा 14 जुलै रोजी समृध्दी महामार्गावरील बाभुळखेड फाटया जवळील पुलावर सदर कंटेनर थांबवीला. कंटेनरचा दरवाजा उघडून पाहीले असता, कंटेनर मध्ये गायी व गो-हे दिसुन आले. दरम्यान कंटेनरला पोलीस स्टेशन मेहकर येथे घेउन आलो. तेथुन पोलीसांसह ग्राम अंत्री देशमुख येथील देवीदास विश्वनाथ देशमुख यांच्या
कन्हैया गोरक्षण मध्ये पोलीसा समक्ष गायी व गो-हे उतरवण्यात आले. त्यामध्ये 4 गायी व 36 गो-हे होते.कंटेनरमध्ये सदर जनावरे ही आखुड दोरीने अँगलला बांधलेले त्या जनावरांचे तोंडे वर बांधलेले होते. त्यांना
श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे व त्यांना क्रुरतेने बांधल्याचे दिसुन आले. जनावरांना चारा व
पाण्याची व्यवस्था केलेली दिसुन आली नाही. तसेच कंटेनर मधील चालक व इतर इसम महंमद हुसेन
यासीन खान वय 30 वर्ष रा. सावरीयां ता. तोडारायसींग जि. टोक (राजस्थान), हमीद जिवा खान वय 40 वर्ष
रा. इस्लामपुरा चाँद डहणी, ता मालपुरा जि टोक, आसाराम जोधाराम भिल वय 19 वर्ष रा सावरीयां ता.
तोडारायसींग जि.टोक यांच्याकडे जनावरांचे मालकी हक्काबाबत व वाहतुक परवाना बाबत कागदपत्रे नसल्याचे आढळून आले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान समृद्धी महामार्ग अवैध रहदारीचा अड्डा ठरत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.