घाटबोरी (हॅलो बुलढाणा)मेहकर मतदारसंघाचे आमदार डॉ. संजय रायमुलकर यांनी सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी व शेतकऱ्यांची कामे सहज व्हावीत या उद्देशाने घाटबोरी येथे गेल्या एक-दिड वर्षांपासून नव्याने अत्याधुनिक तलाठी सज्जा कार्यालयाची इमारत माजी सरपंच गजानन चनेवार यांच्या मागणी नुसार मंजूर केलेली आहे. आणि तलाठी सज्जा इमारतींसाठी मोठ्या प्रमाणात निधी सुद्धा उपलब्ध करुन दिला आहे. मात्र, सरपंच राजकुमार पाखरे यांच्या नियोजनाअभावी सरकारी तलाठी सज्जा कार्यालयाची इमारत जागेअभावी अडगळीत पडलेली आहे.
ग्रामपंचायतीच्या हद्दीत गावात अनेक ठिकाणी तलाठी सज्जा इमारत उभी करण्यासाठी जागा उपलब्ध आहे. तर बहुतांश ठिकाणी
खालीजागेवर गावपुढाऱ्यांचे अतिक्रमण आहे. पण अतिक्रमण काढण्यासाठी सरपंच राजकुमार पाखरे धजावत नसल्याने दुर्लक्ष करीत आहेत. आपल्या पासून मतदारांचा दुरावा होऊ नये यासाठी नात्यागोत्यात अधिक गोडवा यावा म्हणून सरपंच राजकुमार पाखरे यांनी चक्क आपल्याच मेव्हण्याच्या म्हणजे दाजीच्या खाजगी शाळेच्या परिसरात गावापासून दूर असलेल्या आपल्याच शेताच्या धुऱ्यापासी तलाठी सज्जा कार्यालयाची इमारत उभी करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. त्यामुळे सरपंच राजकुमार पाखरे यांचे गोडवा निर्माण करण्याचे राजकारण, संपूर्ण गावकऱ्यांच्या लक्षात येत असल्याने हा चालेला सावळागोंधळ कुठेतरी थांबवावा. या साठी शाळेच्या परिसरात नव्याने होणारी तलाठी सज्जा इमारत याठीकाणी होऊ नये म्हणून गावकऱ्यांची तीव्र नाराजी आहे. नव्याने अत्याधुनिक तलाठी सज्जा इमारत ही एसटी बसस्टँडवर किंवा ग्रामपंचायत कार्यालयाच्या हद्दीत असलेल्या परिसराच्या दर्शनीय भागात तलाठी सज्जा इमारत भव्यदिव्य उभी करावी अशी संपूर्ण गावकऱ्यांकडून मागणी होत आहे.