देऊळगा राजा (हॅलो बुलढाणा) विजेच्या धक्क्याने जीवित हानी वाढत आहे. वानेगाव येथील एका अठरा वर्षीय मुलाचा आज विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. शंकर विष्णू पवार असे मृतकाचे नाव आहे.
शंकर विष्णू पवार आज दुपारी साडेबारा वाजता शेळ्या चारण्यासाठी गेला होता. दरम्यान त्याला विजेचा शॉक लागून धरणाच्या बाजूला गजानन जायभाये यांच्या शेताजवळ तो मरण पावला. याप्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी मार्ग दाखल केला आहे.