spot_img
spot_img

अंबानी कुटुंबाच्या लग्न सोहळ्यात आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांची एन्ट्री!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) लग्न जर अंबानी कुटुंबात होत असेल तर लग्न सामान्य कसे होणार? पण या लग्नात आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांची एन्ट्री झाली. त्यांनी मुकेश अंबानी सोबत हस्तांदोलन करून नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या.

12 जुलै रोजी होणाऱ्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाआधी अनेक फंक्शन्स झाले.
मामेरू, संगीत आणि हळदी समारंभाची झलक सोशल माध्यमातून प्रत्येकाला पाहायला मिळाली. प्रत्येक फंक्शनच्या डेकोरेशनमध्ये नक्कीच काहीतरी खास असायचं. श्रीमंती थाटही येथे बघायला मिळाला. दरम्यान मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा लाडका मुलगा लग्नबंधनात अडकला. राधिका मर्चंट अंबानी कुटुंबाची धाकटी सून झाली आहे.
या शाही लग्नाची सजावटही खास पद्धतीने करण्यात आली होती. या लग्न सोहळ्यात बुलढाणा चे आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांची उपस्थिती राहिली. त्यांनी मुकेश अंबानी ची भेट घेत नवरदेव नवरींना आशीर्वाद दिले. शिवाय यावेळी काही चर्चाही त्यांनी केली.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!