spot_img
spot_img

गुरुजींचे प्रश्न प्रलंबितच! – महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेने घेतली सीईओ यांची थेट भेट!

देऊळगांव राजा (हॅलो बुलढाणा)महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा बुलढाणा जिल्हाध्यक्ष भास्करराव शिंगणे यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी श्री.जंगम यांची थेट भेट घेऊन त्यांना शिक्षकांच्या विविध समस्या सोडविण्याची मागणी करण्यात आली.
गेल्या अनेक दिवसापासून शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात यावे या आशायाचे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.यामध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. जिल्हाभरातील विविध प्रभारी पदांबाबत व पदोन्नती बाबत तसेच विनंती बदल्या तात्काळ करुन अतिरिक्त शिक्षकाचे समायोजन करावे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा बक्षीस वितरण करण्यात यावे. शिक्षक गौरव पुरस्कार दरवर्षी देण्यात यावा. वरिष्ठ निवड श्रेणी बाबत तात्काळ कार्यवाही करावी यासह विविध समस्येबाबत तात्काळ सोडविण्यासात याव्या अशी मागणी करण्यात आली.त्याच्याबरोबर प्राथमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा श्री. खरात यांची भेट घेऊन शिक्षकांच्या समस्या बाबत चर्चा करून निवेदन देण्यात आले. शालेय पोषण आहार पुरवठा मुख्याध्यापकाच्या मागणीनुसार देण्यात यावा.अशी मागणी करण्यात आली. श्री.राठोड यांची भेट घेऊन जिल्ह्यातील प्रलंबित मेडिकल बिल तात्काळ निकाली काढून जीपीएफ स्लिप हिशोबासह तात्काळ देण्यात यावी.यावर राठोड सकारात्मक भूमिका दाखवत 24 जुलै पर्यंत जी.पी.एफ स्लिप पंचायत समिती स्तरावर देण्यात येईल असे सांगितले.यावेळी जिल्हा संघटनेचे सरचिटणीस श्री राजीव जाधव सर, जिल्हा कोषाध्यक्ष श्री. कोळसकर सर,राज्याचे संपर्कप्रमुख श्री. भानुदास लव्हाळे सर,जिल्हा उपाध्यक्ष श्री.शिवरकर सर,श्री विष्णू ठोसरे सर,श्री सुधाकर रिंढे सर, जिल्हा संघटक रवी मुळे, देऊळगाव राजा तालुकाध्यक्ष प्रल्हाद सोसे,नांदुरा तालुका अध्यक्ष श्री.सरोदे सर श्री बंगाळे सर यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!