बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शहरातील चिखली रस्त्यावर दररोज भरणाऱ्या भाजी मंडईचा
प्रश्न सुटता सुटत नाही. विक्रेते रस्ता सोडायला तयार नाहीत आणि
नागरिक रस्त्यावर खरेदी करणे थांबवत नाहीत. आणि पोलिसांची कारवाई देखील होत नाही. परिणामी येथे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
भाजीविक्रीचा व्यवसाय रविकांत तुपकर यांच्या ऑफिस समोरील रस्त्याने व पुढे चांडक लेआउट पर्यंत सुरू आहे. भाजी खरेदीसाठी एकच झुंबड उडते.ताजी भाजी मिळत असल्याने येथे हळूहळू ग्राहकांची संख्या वाढू
लागली. ग्राहकांची संख्या वाढल्याने पुन्हा भाजी विक्रेत्यांची संख्या वाढली.ही संख्या इतकी वाढली की त्यांना रस्ता अपुरा पडू लागला आहे. त्यामुळे भाजी विक्रेत्यांनी हळूहळू रस्त्यावर पाय
पसरले.रस्त्याकडेला बसून भाजी विक्री होत असल्याने येथे नागरिक गर्दी करतात. दरम्यान
रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांमुळे वाहतूक कोंडी होते. परिणामी अपघात देखील होत आहेत. त्यामुळे भाजीसाठी लोक जीवाची बाजी लावत असल्याचे चित्र दिसून येत आहे. याकडे संबंधित यंत्रणा मात्र दुर्लक्षित आहे.