spot_img
spot_img

EXCLUSIVE : चिखलीत ₹71,99,325 लाखांच्या गुटख्याचा ‘अंतिम संस्कार’! न्यायालयाचा आदेश आला अन् डंपिंग यार्डवर……

चिखली (हॅलो बुलढाणा/ सय्यद साहिल) पोलीस स्टेशनच्या हद्दीत सन 2023 पासून विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेल्या प्रतिबंधित गुटख्यावर अखेर कायद्याचा घणाघात झाला आहे. तब्बल ₹71,99,325 किंमतीचा गुटखा आज दि. 02 जुलै 2026 रोजी मा. न्यायालयाच्या आदेशानुसार नगरपरिषद चिखली यांच्या डंपिंग यार्ड येथे नियमानुसार नष्ट करण्यात आला.

विविध कारवायांमध्ये पकडण्यात आलेला हा लाखो रुपयांचा प्रतिबंधित गुटखा पोलीस स्टेशनमध्ये मुद्देमाल म्हणून जमा होता. मात्र न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, संबंधित विभागांच्या उपस्थितीत संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पाळून या मुद्देमालाची विल्हेवाट लावण्यात आली.

गुटख्यासारख्या प्रतिबंधित पदार्थांमुळे तरुण पिढीचे आरोग्य धोक्यात येत असून अशा अवैध धंद्यांविरोधात पोलिसांची भूमिका अधिक कडक असल्याचा संदेश या कारवाईतून मिळाला आहे. जप्त मुद्देमालाचा कोणत्याही प्रकारे गैरवापर होऊ नये, यासाठी न्यायालयीन आदेशानुसार ही कारवाई पारदर्शक पद्धतीने करण्यात आली.

चिखली पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध गुटखा माफियांमध्ये खळबळ उडाली असून सार्वजनिक आरोग्य आणि कायदा अंमलबजावणीच्या दृष्टीने ही कारवाई अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!