spot_img
spot_img

लाडक्या बहिणीच्या नादात दाजी पिक विमा भरायचा राहील बरं का..? – शेवटची तारीख १५ जुलै! – – शेवटच्या तारखेची वाट न बघता आजच आपला पिक विमा भरून घ्या व आपले पीक सुरक्षित करून घ्या. – २४२३४३ शेतकऱ्यांनी काढला १ रुपयांत पीकविमा

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) राज्य शासनाने जून २०२३ पासून राज्यात सर्वसमावेशक पीकविमा योजना लागू केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति अर्ज केवळ १ रुपया भरुन प्रधानमंत्री पीकविमा योजनेत सहभागी होता येत आहे. कपभर चहासाठी ५ ते १० रुपये खर्च करावे लागतात. त्यापैक्षाही स्वस्त रकमेत खरीप हंगामाचा विमा भरता येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४६ हजार ३८८ शेतकऱ्यांनी २ लाख ८१ हजार ७३२ अर्ज केले आहेत.
खरीप हंगाम २०२४ मध्ये पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी १५ जुलै ही मुदत देण्यात आली आहे. अधिसूचित केलेल्या पिकांचा विमा शेतकऱ्यांना भरता येत आहे. शेतकऱ्यांना केवळ १ रुपया भरुन या योजनेत सहभागी होता येत आहे. त्यासाठी पीएमएफबीवाय पोर्टलवर स्वत: शेतकऱ्यांना, तसेच बँक, विमा कंपनी प्रतिनिधी व सामूहिक सेवा केंद्र अर्थात सीएससी मार्फत अर्ज करता येत आहे. परंतु, काही सीएससीधारक शेतकऱ्यांना अतिरिक्त पैसे घेत असल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे येत आहेत. तथापि, सीएसएसी केंद्र चालकांना पीकविमा अर्ज भरण्यासाठी प्रति अर्ज ४० रुपये अदा केले जात आहेत. त्यामुळे जादा पैसे घेत जात असतील तर संबंधित शेतकऱ्यांनी थेट टोल फ्री क्रमांक अथवा प्रत्यक्ष संपर्क साधून तक्रार करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

सीएससीला कंपनीकडून ४० रुपये
पीकविमा योजनेत शेतकऱ्याकडून १ रुपया रक्कम घेऊन त्यांची नोंदणी करण्यासाठी पीकविमा कंपनीकडून प्रती अर्ज ४० रुपये एवढा मोबदला सीएससी धारकाला देण्यात येतो. त्यामुळे त्यांना अतिरिक्त पैसे देण्याची आवश्यकता नाही. त्याबाबत दर्शनी भागात फलक लावण्याचे निर्देश देण्यात आले असून अतिरिक्त रक्कम घेतले जात असल्याची तक्रार शेतकरी किंवा शासनाकडून प्राप्त झाल्यास कडक कारवाई करुन संबंधित सीएससीचा आयडी बंद केला जाणार असल्याचे सीएससी राज्य प्रमुख वैभव देशपांडे यांनी यापूर्वीच कळविले आहे.

कुठे कराल तक्रार
सर्व समावेशक पीकविमा योजनेत सहभागासाठी १ रुपयापेक्षा अधिक रक्कम मागितल्यास अशा सीएससीधारकांची टोल फ्री क्रमांक १४४११, १८००१८००४१७ या टोल फ्री क्रमांकावर तसेच ९०८२९२१९४८ या व्हाट्सॲपवर तक्रार करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
—–
कोणत्या तालुक्यात किती अर्ज
बुलढाणा : २३५५६
चिखली : ३५५४४
देऊळगाव राजा : १५६८९
जळगाव जामोद : १३२३८
खामगाव : १५८१६
लोणार : २०२१०
मलकापूर : ५८४२
मेहकर : ३२१७६
मोताळा : ८३७५
नांदुरा : ११८०२
संग्रामपूर : १६०३०
शेगाव : ११६२०
सिंदखेड राजा : ३२४४५
————
यंदाही गतवर्षीप्रमाणे केवळ १ रुपया प्रति अर्ज भरुन पीकविमा योजनेत सहभागी होता येत आहे. विहित मुदतीपर्यंत शेतकऱ्यांनी अर्ज करुन योजनेत सहभागी व्हावे, सीएससी धारकांकडून १ रुपयापेक्षा अधिक पैशाची मागणी केले जात असल्यास तशी तक्रारी द्यावी, संबंधित चालकावर कारवाई केली जाईल- मनोजकुमार ढगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बुलढाणा

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!