बुलढाणा (हॅलो बुलढाणा) वाहनधारकांना दरवर्षी वाहन फिटनेस सर्टिफिकेटचे नूतनीकरण करून घेणे अनिवार्य असते. मात्र, नूतनीकरण वेळेत झाले नाही तर चालकांकडून प्रतिदिन ५० रुपये दंड आकारला जातो. ही दंडाची रक्कम वाढत जाते. हा दंड चालकांना परवडणारा नसल्याने रद्द करा आणि त्यांना दिलासा द्या, अशी मागणी वाहनधारक, संघटनांनी रेटली होती. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी प्रतिदिन ५० रुपये विलंब शुल्क स्थगीत केले आहे.
नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्टिफिकेट असणे हे गरजेचे आहे. नूतनीकरण वेळेत झाले नाही तर रिक्षा चालकांकडून प्रतिदिन दंड आकारला जातो. कालांतराने दंडाची रक्कम भरणे अशक्य होते. त्यामुळे सर्टिफिकेट चे नूतनीकरण काही कारणाने लांबत जाते, हे लक्षात घेऊन दंडच रद्द करावा,अशी मागणी करण्यात आली होती. या मागणीला गंभीरतेने घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फिटनेस सर्टिफिकेट चे प्रतिदिन विलंब शुल्क पुढील आदेशापर्यंत स्थगीत केले आहे. ही घोषणा ११ जुलै रोजी विधानसभा सभागृहात निवेदनाव्दारे करण्यात आली. यामध्ये १५ वर्षाच्या आतील सर्व परिवहन वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणास विलंब झाल्यानंतर प्रतिदिन रुपये ५० एवढे विलंब शुल्क. आकारण्याच्या कार्यवाहीस पुढील आदेश होईपर्यंत स्थगिती देण्याची घोषणा केली आहे.