spot_img
spot_img

मोदी-फडणवीसांवर टीका करताना सपकाळांनी स्वतःची उंची लक्षात ठेवावी! – आ. डॉ. संजय कुटे यांचा घणाघात

ज.जामोद (हॅलो बुलडाणा) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरून भाजप आक्रमक झाली असून भाजपा प्रदेश सरचिटणीस तथा आमदार संजय कुटे यांनी सपकाळांवर जोरदार निशाणा साधला आहे.

स्वतःला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे पाईक म्हणवून घेणाऱ्या सपकाळांना भाषेची आणि विचारांची मर्यादा जपता येत नसेल, तर ही महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारी बाब आहे, असा घणाघात डॉ. कुटे यांनी केला.

महाराष्ट्राची राजकीय परंपरा ही सभ्यता, संस्कार आणि वैचारिक भूमिकांवर उभी आहे. मतभेद असू शकतात, पण वैयक्तिक टीका आणि खालच्या स्तरावरील भाषा लोकशाहीला शोभणारी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसकडून सातत्याने वैचारिक दिवाळखोरीचे प्रदर्शन सुरू असून सुजाण जनता हे कदापि सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

भाजपच्या वतीने हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा जाहीर आणि तीव्र निषेध करतो, असेही डॉ. कुटे यांनी ठणकावून सांगितले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!