बुलढाणा (हॅलो बुलढाणा) भारत साधुसंतांची भूमी आहे. वारकऱ्यांचे स्वागत आणि वारकऱ्यांचा सत्कार करणे आपली संस्कृती आहे. याच संस्कृतीतून आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड यांनी
शेलगाव बाजार येथील वारकऱ्यांचा टोपी आणि शाल देऊन सत्कार केला.
बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील मोताळा तालुक्यातील ग्राम.शेलगाव बाजार येथील राजेश पुरुषोत्तम खर्चे यांच्यासह १० ते १५ ग्रामस्थ आषाढीवारी निमित्याने श्रीक्षेत्र पंढरपूर येथे रवाना होत आहे. त्या निमित्ताने आज ११ जुलै रोजी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजुभाऊ गायकवाड यांचे सुपुत्र महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारणी सदस्य युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांनी शिवसेना मातोश्री जनसंपर्क कार्यालय येथे पंढरपूर येथे जाणाऱ्या समस्त वारकऱ्यांचा पांढरी टोपी आणि पांढरा शेला देऊन सत्कार केला तसेच त्यांचे आशीर्वाद घेतले.
यावेळी युवासेना विधानसभा समन्वयक दीपक तुपकर,युवासेना सोशल मीडिया जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडवे,स्वीय सहाय्यक श्रीकृष्ण शिंदे,रोहित गवळी, विकी आव्हाड, विवेक घाडगे, गजानन शिंदे,योगेश ढवळे, शंकर शेळके यांच्यासह शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.