बुलढाणा (हॅलो बुलढाणा) ‘हाजीर हो!’असा शब्द प्रत्येकांनी ऐकलेला आहे. परंतु आता या शब्दांचा आवाज थेट कलेक्टर ऑफिसमध्ये पोहोचला आहे. विशेष म्हणजे बुलढाणा जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनाच लोकायुक्तांनी निर्देश दिले आहेत. काय प्रकरण असेल बरं?’हॅलो बुलढाणाने’ याची संपूर्ण माहिती घेतली आहे.
एका अवैध रेती वाहतूक प्रकरणी जिल्हाधिकारी पाटील यांना समन्स आला आहे. प्रकरण असे आहे की,जिल्हाधिकारी किरण पाटील यांना मानवी आयोगासमोर हजर राहण्यासाठी समन्स पाठविला आहे. 23 जुलैला 11.00 वाजता व्यक्तिगत बोलविण्यात आले आहे.
संतोष भुतेकर यांनी अवैध रेती वाहतूक होत आहे म्हणून जिल्हाधिकारी यांच्या कडे तक्रार केली होती. परंतु जिल्हाधिकारी यांनी दालना मध्ये आलेल्या तक्रारदारांचे समाधान न करता त्यांना असभ्य वर्तणूक करून हाकलून लावले. अगदी खुर्चीवरून उठून त्यांच्या अंगावर धावून आले. त्यामुळे वैतागलेल्या तक्रारदारांनी वरिष्ठांची पत्रव्यवहार केला. त्यांच्याकडे सर्व पुरावे आहेत.परिणामी तक्रारीवरून लोकनियुक्तांनी याची दखल घेतली आणि जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांना याचा जाब विचारण्यासाठी समन्स जरी केला आहे.