बुलढाणा (हॅलो बुलढाणा) वन्य प्राण्यांच्या शिकारी दिवसागणीक वाढताहेत.’फेक डिमांड’ च्या जाळ्यात अडकून अनेक लोक वन्य प्राण्यांची तस्करी करत आहेत.रानडुक्कर, हरीण यांची दररोज शिकार होत असून,आता यशवंती म्हणजेच घोरपड देखील शिकाऱ्याच्या रडावर आहे.
वन्यप्राण्यांची तस्करी, खरेदी-विक्री तसेच शिकाऱ्यावर बंदी असून यासाठी भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार आरोपींना शिक्षा देखील करण्यात येते.मात्र तरी देखील तस्करी वाढत आहे. वनविभागाच्या नियमाप्रमाणे घोरपड हा वन्यप्राणी असून तिच्या शिकारीवर बंदी आहे मात्र तरीदेखील काही समुदायाकडून राजरोसपणे ही शिकार केली जाते आणि तिच्या अवयवांची तस्करी केली जाते तसेच तिचे मांस देखील विकले जाते. घोरपड या प्राण्याबद्दल समाजात अनेक गैरसमज असून त्यातून घोरपड ही सांधेदुखी आणि वात विकार यासाठी गुणकारी असल्याचे अनेक गैरसमज आहेत. अर्थातच या गोष्टीला वैज्ञानिक आधार कुठलाही नाही.दरम्यान रानडुक्कर, हरिण,ससा, मोर आणि आता घोरपडीचे मास चोरून विकल्या जात असून वन विभागाला याकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याचे चित्र आहे.