बुलढाणा (हॅलो बुलढाणा/ सुनील मोरे) जगप्रसिद्ध उल्कानगरीत म्हणजेच लोणार सरोवर अभयारण्य म्हणून घोषित झाले आहे. या पर्यटन स्थळी मोरांचे नृत्य पर्यटकांसाठी पर्वणी ठरत आहे.
लोणार येथील खाऱ्या पाण्याचे सरोवर प्रसिद्ध आहे. हे अभयारण्य 365 हेक्टर जागेतील जिल्हातील सर्वात लहान अभयारण्य ठरले आहे. लोणार सरोवर अभयारण्यातील 365 हेक्टर परिसरात बिबट्या, कोल्हे, राष्ट्रीय पक्षी मोर यासारख्या अनेक वन्य प्राण्यांचा वावर आहे अशातच अता लोणार सरोवर येथे राष्ट्रीय पक्षी मोरांचे आकर्षण केंद्र बनले आहे. मोरांचा विनी चा हंगाम पावसाळयाच्या सुरवातीला असतो त्यामुळे साधारण पने ( मे.महीन्या पासुन ते जुन) अखेर पर्यंत लांबलचक पिसारा फुलविणारे मोर झुंडीच्या झुंडीने बुलढाणा जिल्हातील लोणार सरोवरात दिसून येत आहे.वन्यजीव अभयारण्यायध्ये मोरांचे नृत्य हे डोळ्याला भुरळ पाळणारे आहे.आषाढ महिन्याचे सुरवातीलाच जेव्हा पाऊस चालु होतो तेव्हा यांचे नृत्य सर्वांनां मोहीत करते.