spot_img
spot_img

EXCLUSIVE “माहिती अधिकाराचे ‘हिXX’ धंदे मी करत नाही, घरात चौकशी करा!”; आमदार संजय गायकवाडांची श्वेता महालेंवर जहरी टीका, म्हणाले, ‘पाठीत खंजीर खुपसणे आम्हाला…’

चिखली (हॅलो बुलढाणा) मतदारसंघात महायुतीतील अंतर्गत संघर्ष आता उघडपणे पेटला असून, संजय गायकवाड यांनी भाजप आमदार श्वेता महाले यांच्यावर अत्यंत जहरी आणि खालच्या स्तरावरील शब्दांत टीका करत राजकीय वादाला चांगलाच तडका दिला आहे.

“माहिती अधिकाराच्या नावाखाली दबाव टाकण्याचे ‘हिXX’ धंदे मी करत नाही, ते कोण करतंय हे तुमच्या घरात चौकशी करा,” असा थेट आणि वादग्रस्त टोला लगावत गायकवाड यांनी आ.महालेंवर जोरदार हल्ला चढवला. त्यांच्या या वक्तव्यामुळे चिखलीतील राजकीय वातावरण अक्षरशः तापलं आहे.

वादाची ठिणगी तेव्हा पडली, जेव्हा महाले यांनी गायकवाडांवर गंभीर आरोप करत म्हटलं की, ते RTI चा धाक दाखवून सरपंच आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांवर दबाव टाकतात आणि पक्षवाढ करतात. या आरोपांना प्रत्युत्तर देताना गायकवाड आक्रमक झाले.

“आमचं काम सरळ आहे, छातीला छाती भिडवून राजकारण करायचं. पाठीत खंजीर खुपसणं आम्हाला जमत नाही,” असा इशारा देत त्यांनी महालेंच्या कार्यपद्धतीवरही अप्रत्यक्ष निशाणा साधला. पुढे ते म्हणाले, “चिखलीत माझे नातेवाईक आहेत, पण माझ्याबद्दल चांगली पोस्ट केल्यावर त्यांना धमकावलं जातं. शिवसैनिकांनी भाजप आमदारांना वारंवार निवडून आणलं, पण आता आमच्या कार्यकर्त्यांनाच पक्ष बदलण्याचा दबाव टाकला जातो.”

इतक्यावरच न थांबता गायकवाड यांनी थेट आव्हान देत म्हटलं, “कोणाला जेलमध्ये टाकणार, कोणाला धमकावणार हे आता आम्हीही पाहणार आहोत. मी घरात बसणारा आमदार नाही; संपूर्ण महाराष्ट्रात माझं नाव आहे.”

महायुतीतील हा संघर्ष आता उघड रणांगणात उतरला असून, येत्या काळात चिखलीत राजकीय समीकरणे अधिकच ढवळून निघण्याची चिन्हे दिसत आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!