चिखली (हॅलो बुलडाणा) चिखली शहरात भाजपाची “SIR” बैठक जोरदार वातावरणात पार पडत कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. भाजपाचे नेते व खासदार किरीट सोमय्या हे विशेष उपस्थित राहिल्याने बैठकीला राजकीय वजन प्राप्त झाले. सोमय्या यांनी थेट कार्यकर्त्यांशी संवाद साधत संघटन अधिक आक्रमक व गतिमान करण्याचे संकेत दिले.
श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेत झालेल्या या बैठकीत बूथस्तरावर पक्ष बळकट करण्यावर जोर देण्यात आला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनीती आखत जनतेपर्यंत पक्षाची भूमिका अधिक प्रभावीपणे पोहोचविण्याचे आवाहन करण्यात आले. किरीट सोमय्या यांच्या भेटीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून “चिखलीत भाजपाची ताकद वाढणार” असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या बैठकीस भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे, अंकुशराव पडघान, यांच्यासह अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी एकजूट दाखवत आगामी काळात अधिक जोमाने मैदानात उतरण्याचा निर्धार व्यक्त केला.
एकूणच, किरीट सोमय्या यांच्या चिखली भेटीने राजकीय समीकरणांना वेग आला असून, जिल्हा भाजप आता आक्रमक मोडमध्ये जाण्याचे स्पष्ट संकेत दिसत आहे.










