बुलढाणा (हॅलो बुलढाणा) गेल्या दोन दिवसांपासून काही प्रमाणात पाऊस कोसळतोय.खामगावात पावसाने चांगलेच डोळे वटारले! अजूनही 10 जुलैला पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान ‘हॅलो बुलढाणा’ने कुठे किती पाऊस झाला या आकडेवारीवर दृष्टीक्षेप टाकला आहे.
जून महिन्यात पावसाने बरीचशी विश्रांती घेतली आहे. तर आता पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे.गेल्या काही वर्षांमध्ये पावसाचा लहरीपणा वाढला. अशात जिल्ह्यात आठ दिवसांमध्ये आतापर्यंत एकूण 35.1 % तर अमरावती विभागात 34.7% पाऊस झाला.जळगाव जामोद 56.8 – 32.3%, संग्रामपूर: 46.4 – 20.9%,चिखली 63.1.- 29.7%, बुलढाणा 56.2- 28.2%, देऊळगाव राजा 27.0-15.5%,
मेहकर 90.0- 40.8%,सिंदखेड राजा 42.0.- 20.7%,
लोणार 61.5 -26.8%, खामगाव 112.4 – 59.1%,
शेगाव 58.8- 34.8%,मलकापूर 39.0- 21.6%,मोताळा 103.5- 58.8%,नांदुरा 52.0- 25.9% मिलिमीटर आणि टक्के पाऊस झाला आहे.