बुलढाणा (हॅलो बुलढाणा) तसे तर पोलीस गुन्हेगारांना कैद करतात. आज ८ जुलैला मात्र सर्पमित्र रसाळ यांनी पीएसआय भांगे यांच्या शेजारी निघालेल्या विषारी घोणस सापाला शिताफिने कैद केले.
बुलढाणा शहरातील महावीर नगर येथे पी एस.आय.भांगे यांच्या शेजारी सकाळीच ६ वाजता पाण्याच्या टाक्यात अती विषारी घोणस जातीचा साप आढळून आला. दरम्यान सर्पमित्र श्रीराम रसाळ यांना पाचारण करण्यात आले. सर्पमित्र रसाळ यांनी या घोणस जातीच्या सापाला पकडून वन विभाग कडे दिले आहे. दरम्यान सर्पमित्र जीवाची परवाना न करता विषारी सापांना पकडतात याबद्दल पीएसआय भांगे यांनी त्यांचे आभार मानले.