देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा/ प्रतीक सोनपसारे) देऊळगाव राजा तालुक्याला 2020 पासून बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या नवीन विहिरी मिळणे बंद झाल्याचे दुर्दैवी चित्र आहे. यासंदर्भात शरद खरात यांनी जाचक अटी रद्द करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले.
भूजल सर्वेक्षण विभागाने काही दिवसापूर्वी सर्वेक्षण केले होते त्या सर्व्हे मध्ये संपूर्ण देऊळगाव राजा तालुका क्रिटिकल झोन मध्ये दाखवला होता आता बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ही अनुसूचित जाती जमाती साठी राबविण्यात येत असल्याने देऊळगाव राजा तालुक्यातील लोकांना सदर योजनेचा फायदा सन 2020- 21 पासून मिळणे बंद झाले आहे आता शासनाने क्रिटिकल झोन ही अट नियमबाह्य करून मागासवर्गीयांना दिलासा द्यावा अशी मागणी आर.पी. आय आठवले गटाचे उपजिल्हाप्रमुख शरद खरात यांनी निवेदनाद्वारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे केली आहे.