spot_img
spot_img

शेती पिकाचे नुकसान करणाऱ्या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्याची मागणी

सिंदखेडराजा (हॅलो बुलडाणा/ प्रतीक सोनपसारे) सिंदखेडराजा तालुक्यात वन्य प्राण्यांची संख्या खूपच वाढली असून जंगली प्राण्यांचा जास्तच उद्रेक वाढला आहे .त्यामुळे खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचे नुकसान होत आहे. तरी संबंधित वन विभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी तालुक्यातील शेतकरी करीत आहेत.पावसाळा सुरू होऊन एक महिना झाला तरीही महसूल मंडळात समाधानकारक पाऊस झालेला नसला तरीही शेतकरी कुठवर वाट पाहणार या आसेने बँकेचे कर्ज काढून सोयाबीन, कपाशी, तूर , मुंग, उडीद अशा पिकांची पेरणी केली आहे. मात्र पीक जमिनीच्या वर येताच वन्यप्राणी या पिकाची नासाडी करीत आहेत. खरिपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्याला सावकाराचे ,बँकेचे कर्ज काढावे लागले ते येणाऱ्या पिकाच्या आधारावर फेडायचे असते ,मात्र शासन शेतकऱ्याला फक्त घोषणा देत आहे . त्या पाठोपाठ वन्यप्राणीही शेतकऱ्याची पाठ सोडायला तयार नसून मोठ्या प्रमाणावर नीलगाय ,रोहि, रानडुक्कर, माकड मोठ्या प्रमाणात नासाडी करत आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकरी चिंतातूर झाला आहे. खरीप हंगामात सुद्धा शेतकऱ्याला नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. तरी वन विभागाने वन्य प्राण्यांची प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी आणि वन्य प्राण्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी करीत असून झालेल्या पिकाच्या नुकसानीची भरपाई तात्काळ लवकरात लवकर वन विभागाने द्यावी .अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!