spot_img
spot_img

बुलढाण्यात संताप उसळला; हर्षवर्धन सपकाळ यांचा पुतळा जाळला!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतान यांच्याशी केल्याच्या कथित वक्तव्यामुळे बुलढाण्यात संतापाचा ज्वालामुखी उसळला. या विधानाच्या निषेधार्थ १५ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२ वाजता जयस्तंभ चौक येथे भाजपाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात आले. संतप्त कार्यकर्त्यांनी सपकाळ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास चपला-जोडे मारत दहन केले आणि काँग्रेसविरोधी जोरदार घोषणाबाजी केली.

भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना संताप व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आहेत. त्यांच्या कार्याची तुलना कुणाशीही करणे म्हणजे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा अवमान आहे. सपकाळ यांनी तात्काळ जाहीर माफी मागावी, असा इशारा त्यांनी दिला. शहराध्यक्ष मंदार बाहेकर यांनीही काँग्रेसच्या भूमिकेवर सडकून टीका करत सपकाळ यांच्या वक्तव्याचा निषेध केला.

या आंदोलनात जिल्हा महामंत्री दत्ता पाटील, जेष्ठ नेते दीपक वारे, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत बरदे, विलास मानवतकर, डॉ. तेजराव नरवाडे, जिल्हा सचिव मुन्नाजी बेंडवाल, मंडळ अध्यक्ष सतीश भाकरे, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सौ. उषाताई पवार, महिला शहराध्यक्ष सौ. वर्षाताई पाथरकर, सौ. रंजनाताई कायस्थ, सौ. शोभाताई ढवळे, शिक्षक आघाडी जिल्हा संयोजक संदीप नरोटे, सौ. वेदाताई कथने, अनुसूचित जाती जिल्हाध्यक्ष ॲड. दिगंबर अंभोरे, सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष ॲड. मोहन पवार, कामगार मोर्चा जिल्हाध्यक्ष दत्ता शिंदे, बाजार समिती संचालक ॲड. सुनील देशमुख, राजेंद्र खरात, अण्णा देवकट्टी, तुषार पडोळ, अरविंद जाधव, ॲड. दशर्थसिंग राजपूत, संजय जुंबड, वैद्यकीय आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश्वर उबरहंडे, पवन बगाडे, संजय मोटे, मिलिंद चिंचोळकर, केशव बेंडवाल, मोहन निमरोट, नितीन दासार, प्रदीप सोनटक्के, राजेंद्र पवार, सुभाष कदम, तुकाराम राठोड, सचिन टेंभिकर, मंडळ अध्यक्ष अनिल जाधव, सारंग एकडे यांसह शेकडो पदाधिकारी व शिवप्रेमी सहभागी झाले होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!