spot_img
spot_img

💥EXCLUSIVE बुलढाणा मेडिकल कॉलेजला स्व.अजितदादांचे नाव? डॉ. राजेंद्र शिंगणे काय म्हणाले? वाचा

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व सर्वसामान्यांचे लाडके नेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघाती निधनाने संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले असताना, जिल्ह्यात मात्र त्यांच्या कार्याचा ठसा जिवंत ठेवण्यासाठी ठोस मागणी पुढे आली आहे. बुलढाणा येथील सर्वपक्षीय श्रद्धांजली कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांनी एकमुखाने बुलढाणा मेडिकल कॉलेजला स्व. अजितदादांचे नाव देण्याची जोरदार मागणी केली आहे.

आज बुलढाणा येथे आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेला विद्यमान व माजी आमदार, खासदार, विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, बुलढाण्यात मेडिकल कॉलेज उभे राहण्यामागे स्व. अजितदादांचा सिंहाचा वाटा आहे. सर्वांचा पाठपुरावा होता, पण शासनस्तरावरून विशेष आणि निर्णायक पाठपुरावा अजितदादांनीच केला.

मेडिकल कॉलेजसाठी आवश्यक असलेला प्रारंभिक निधी, मंजुरी आणि प्रशासनावरचा दबाव हे सर्व अजितदादांच्या माध्यमातूनच शक्य झाले, असेही डॉ. शिंगणे यांनी ठणकावून सांगितले. त्यामुळे या मेडिकल कॉलेजला स्व. अजितदादांचे नाव देणे ही केवळ भावना नसून त्यांच्या कार्याचा योग्य सन्मान असल्याचे मत सर्वपक्षीय नेत्यांनी व्यक्त केले.

याचबरोबर  जिल्ह्यातील जिगाव प्रकल्पाला स्वर्गीय माजी मंत्री भारतभाऊ बोंद्रे यांचे नाव देण्यात यावे, अशीही सर्वपक्षीय मागणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व आमदार, माजी आमदार व खासदार मिळून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी अधिकृतपणे मांडणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!