spot_img
spot_img

सुलतानपूरमध्ये सत्ता तरुणांच्या हाती! संघपाल पनाड बिनविरोध उपसरपंच

सुलतानपूर (हॅलो बुलडाणा/मोईन खान)
लोणार तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या व सर्वात मोठ्या सुलतानपूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी युवा नेते संघपाल पनाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे सुलतानपूर गावात उत्साहाचे वातावरण असून, ग्रामस्थांकडून समाधान आणि आनंद व्यक्त केला जात आहे. तरुण नेतृत्वाच्या हाती सत्तेची धुरा गेल्याने गावाच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

संघपाल पनाड यांनी आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात तळागाळातील प्रश्नांपासून केली आहे. सर्वसामान्यांच्या अडचणी समजून घेणे, तत्परतेने काम करणे आणि प्रामाणिकपणा ही त्यांची ओळख ठरली आहे. अल्पावधीतच त्यांनी ग्रामस्थांचा विश्वास संपादन केला असून, त्यांच्या बिनविरोध निवडीकडे याच विश्वासाचे प्रतिबिंब म्हणून पाहिले जात आहे. या निवडीमुळे सुलतानपूरच्या राजकारणात नवे पर्व सुरू झाल्याची चर्चा आहे.

निवडीनंतर प्रतिक्रिया देताना संघपाल पनाड म्हणाले, ग्रामस्थांनी माझ्यावर जो विश्वास व्यक्त केला आहे, त्याला तडा जाऊ देणार नाही. गावाचा सर्वांगीण विकास, पारदर्शक कारभार आणि केंद्र व राज्य शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे हेच माझे मुख्य उद्दिष्ट राहील.या निवडीचे ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केले असून, संघपाल पनाड यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!