बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बुलढाणा जिल्ह्यात भाजपचे विस्तारक म्हणून कार्य केलेल्या व अकोल्याच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आपले वलय निर्माण करणाऱ्या नाना कुळकर्णी यांच्या ‘चारधाम यात्रेची’ इंडिया बुक ऑफ रिकॉर्ड मध्ये नोंद करण्यात आली आहे.
दोन पिढयांपासून संघाचे स्वयंसेवक आणि त्यांनी १९७५-७७ या काळात आणिबाणी मध्ये भूमिगत कार्य केले. १९९५ पासून सातत्याने भारतीय जनता पार्टी अकोला जिल्हा निवडणूक कार्यालयाची जवाबदारी सांभाळली तसेच भाजपचे पश्चिम विदर्भात विस्तारक म्हणुनही कार्य केले. शिवाय त्यांनी बुलढाणा जिल्ह्यात भाजपचे विस्तारक म्हणून जिल्ह्यात सशक्त बुथ नेटवर्क उभे केले. नानांचा पायी चालणे हा छंद आहे. दोन्ही पायांचे ऑपरेशन होऊन गुडघे बदली केल्यानंतरही रोज १० ते १५ कि.मी. अगदी सहजपणे ते चालतात. त्यांनी अतिशय कठीण समजल्या जाणारी ३५०० कि.मी. लांब पल्ल्याची अशी नर्मदा परिक्रमा १९ नोव्हेंबर २०२१ ला सुरु करून पुढील चार महिन्यात पायी चालत पूर्ण केली.यानंतर ४ नोव्हेंबर २०२२ ला त्यांनी गुजरातमधील ३६ कि.मी. लांब अशी गिरनार पर्वत परिक्रमा ११ तास १७ मिनिटात पूर्ण केली. ५ नोव्हेंबर २०२२ ला त्यांनी ४ तास ११ मिनिटांत श्री दत्त शिखर १० हजार पायऱ्या चढणे आणि उतरणे पूर्ण केले. या दोन्ही कार्याची इंडिया बुक रेकॉर्ड मध्ये नोंद सुध्दा झाली आहे. त्यांच्या नावावर अनेक विक्रमाच्या नोंदी आहेत.