spot_img
spot_img

‘सुप्रो’चा सुपात! अतिवेगाने घेतला युवकाचा जीव, आई गंभीर जखमी

चिखली (हॅलो बुलडाणा/ सय्यद साहिल) तालुक्यातील मेरा बुद्रुक गावावर आज सायंकाळी शोककळा पसरली. कोणड रोड, वरुड (ता. जाफ्राबाद, जि. जालना) येथे आज सायंकाळी सुमारे ५:१५ वाजताच्या दरम्यान भरधाव महिंद्रा सुप्रो मालवाहक गाडीने दुचाकीवर पलटी घेतल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात मेरा बुद्रुक येथील युनूस इसा शाह (वय ४०) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची आई रुकसानाबी इसा शाह (वय ६०) या गंभीर जखमी झाल्या आहेत.

चांडोल येथून दुचाकीवरून आपल्या घरी, मेरा बुद्रुककडे परतत असताना हा अपघात घडला. प्रत्यक्षदर्शींनुसार, मालवाहक वाहन प्रचंड वेगात होते. नियंत्रण सुटल्याने गाडी थेट दुचाकीवर उलटली. निष्काळजी वाहनचालक, अतिवेग आणि रस्त्यावरील सुरक्षिततेचा अभाव यामुळेच हा अपघात झाल्याचा संताप नागरिकांनी व्यक्त केला आहे.

अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. जखमी रुकसानाबी यांना तत्काळ डॉ. राऊत यांच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतदेह उपजिल्हा रुग्णालय चिखली येथे शवविच्छेदनासाठी आणण्यात आला आहे.या घटनेमुळे चिखली तालुक्यातील मेरा बुद्रुक गावात हळहळ व्यक्त होत असून, भरधाव वाहनांवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!