spot_img
spot_img

गव्हाचे दाणे आले, पण ज्वारी नाही – रेशनचे प्रकरण चिठ्ठीत!

मेहकर (हॅलो बुलडाणा/अनिल राठोड) शासनाच्या सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत (PDS) रेशन वितरण तालुक्यात गोंधळाची साखळी निर्माण झाली आहे. गहू व तांदूळ उपलब्ध असूनही ज्वारीच्या साठ्यामुळे रेशन दुकाने बंद पडली आहेत. परिणामी, गरीब व अत्यल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबांना धान्य मिळवण्यासाठी रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.

तालुक्यातील रेशन दुकानदारांनी स्पष्ट केले की, तांत्रिक नियमांनुसार गहू, तांदूळ व ज्वारी एकत्र वाटप करणे आवश्यक आहे. ज्वारीचा साठा वेळेत न पोहोचल्यामुळे संपूर्ण रेशन वितरण ठप्प आहे. स्थानिकांनी नाराजी व्यक्त करत म्हणाले, गहू-तांदूळ आले तरी ज्वारीशिवाय धान्य मिळत नाही.

तहसील प्रशासन आणि पुरवठा विभागाकडून अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती मिळालेली नाही. शासन पौष्टिक तृणधान्यांचा प्रचार करत असताना प्रत्यक्ष वितरणात झालेला विलंब नागरिकांसाठी मोठा धक्का ठरतो आहे.ग्रामीण जनतेकडून तातडीने ज्वारीचा पुरवठा सुनिश्चित करण्यासह गहू व तांदूळचा तातडीने वाटप करण्याची मागणी जोर धरत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!