spot_img
spot_img

नियम धाब्यावर! आरबीआयने नांदुरा अर्बन बँकेवर ठोठावला दंड

नांदुरा (हॅलो बुलडाणा) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने महाराष्ट्रातील द नांदुरा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, नादुरा या बँकेवर थेट कारवाई करत एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. आरबीआयने 13 जानेवारी 2026 रोजी हा आदेश जारी केला असून, बँकिंग नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बँक व्यवस्थापनावर हा स्पष्ट इशारा मानला जात आहे.

बँकिंग नियमन कायदा 1949 च्या सेक्शन 46 (4)(i) व 56 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. आरबीआयने 31 मार्च 2025 रोजी बँकेच्या आर्थिक स्थितीचे सखोल परीक्षण केले असता, नांदुरा अर्बन बँकेने आरबीआयच्या महत्त्वाच्या सूचनांचे पालन न केल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे, बँकेने नाममात्र सदस्यांना नियमबाह्य व मर्यादेपेक्षा जास्त कर्ज मंजूर केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणी आरबीआयने कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र बँकेकडून सादर करण्यात आलेली कारणे समाधानकारक नसून, त्रुटी कायम असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आरबीआयने दंडात्मक कारवाई करत बँक व्यवस्थापनाला धडा शिकवला आहे.

दरम्यान, ही कारवाई केवळ आर्थिक दंडापुरती मर्यादित असल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे. मात्र, नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सहकारी बँकांवर आरबीआयची नजर अधिक तीव्र झाल्याचे संकेत या कारवाईतून मिळत आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!