spot_img
spot_img

💥BREAKING ईरटीगाच्या भयंकर धडकेत बुलढाण्याच्या मिलिंद नगरचा तरुण ठार!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) तालुक्यातील वरवंड फाटा परिसरातील गारवा हॉटेल जवळ आज भीषण अपघात घडला असून, खामगावकडून बुलढाण्याकडे येणाऱ्या एका ईरटीगा चारचाकी वाहनाने बुलढाणा रोडने खामगावकडे जाणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. दुचाकीवर दोन युवक होते.

या अपघातात विशाल खंडारे (वय अंदाजे 22 ते 23, रा. मिलिंद नगर, बुलढाणा) या युवकाच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेला वसंत घेवंदे व वैभव खंडारे त्याचा भाऊ गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात इतका भीषण होता की काही काळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

विशेष म्हणजे, वरवंड फाटा परिसर हा अपघातप्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. तरीही येथे वेगमर्यादा, योग्य सूचना फलक आणि पोलीस बंदोबस्त का नाही, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधित ईरटीगा वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!